मुलाचा खून करणार्‍याचा गोळीबारातून बदला घेण्याचा डाव उधळला : भुसावळातील पित्याला बेड्या, दुसरा संशयीत पसार


Son’s killer’s plan to take revenge by shooting foiled : Bhusawal father in shackles, second suspected जळगाव : भुसावळातील अल्पवयीन तरुणाच्या हत्येतील संशयीत आरोपीची नशिराबाद उड्डाणपुलाखाली चाकू व गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती मात्र मुलाच्या हत्येने व्यथित झालेल्या पित्याने आरोपींचा काटा काढण्यासाठी डाव आखला मात्र शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयीत पित्याच्या आरोपीला जळगावात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. मनोहर आत्माराम सुरळकर (50, पंचशील नगर, भुसावळ) असे अटकेतील संशयिताचे नाव असून अन्य एक संशयीत पसार झाला आहे.

हत्येचा बदला घेतला होता हत्येतून
भुसावळात गतवर्षी 18 ऑक्टोबर 2020 रोजी संशयीत धम्मप्रियसह अन्य पाच आरोपींनी मो.कैफ (17) या तरुणाची हत्या केल्याचा आरोप होता. भावाची हत्या करणार्‍यांचा सूड घेण्यासाठी संशयीत तथा मयताचा भाऊ शेख समीर शेख जाकीर (21, पंचशील नगर, भुसावळ) व शेख रेहान शेख नईम (22, पंचशील नगर, भुसावळ) यांनी धम्मप्रिय मनोहर सुरळकर (19, पंचशील नगर, भुसावळ) या तरुणाची 21 सप्टेंबर 2021 रोजी जळगाव कारागृहातून जामिनावर सुटका झाल्यानंतर नशिराबाद उड्डाणपुलाखाली गोळीबार करून तसेच चाकूचे वार करून हत्या केली होती तर मनोहर सुरळकरदेखील या हल्ल्यात जखमी झाले होते. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या काही तासात दोघा आरोपींना अटक करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले होते तर तपासादरम्यान आवेज बिस्मिल्ला मणियार (20, भुसावळ) यासदेखील अटक करण्यात आली होती.







मुलाच्या हत्या करणार्‍यांना शिकवायचा होता धडा
नशिराबाद येथे धम्मप्रिय मनोहर सुरळकर (19) या तरुणाची हत्या झाल्यानंतर त्याचे वडिल मनोहर सुरळकर प्रचंड व्यथित झाले होते व मुलाची हत्या करणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी तयारी सुरू केली होती. धम्मप्रियच्या हत्येप्रकरणी संशयित शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर (21) आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन (21, दोन्ही रा.पंचशील नगर, भुसावळ) या दोघांना अटक करण्यात आल्यानंतर ते कारागृहातच असल्याने सोमवारी खटल्याची तारखेला त्यांना सकाळी सुमारे अकराच्या सुमारास कोर्टात आणणार असल्याची माहिती कळताच मयत धम्मप्रिय या तरुणाचे वडील मनोहर सुरळकर यांनी संशयित सुरेश रवी इंधाटे यास सोबत घेत बुरखा परीधान करून न्यायालयाच्या परीसरातील मंदिराजवळ दबा धरला होता. पोलिसांच्या एका खबर्‍याला संशय आल्याने त्याने ही माहिती शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी डाव उधळत सुरळकर यांना अटक केली मात्र सुरेश रवी इंधाटे पसार झाला. सुरळकर यांच्या अंगझडतीत त्यांच्या पर्समधून पिस्टलव पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी तेजस मराठे, योगेश इंधाटे, गजानन बडगुजर, उमेश भांडारकर, शहर वाहतूक शाखेचे परमेश्वर जाधव यांनी धाडसी कारवाई करीत सुरळकर यांना अटक केली तर सुरेश रवी इंधाटे पसार होण्यात यशस्वी झाला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !