जळगावात पाण्यावरून भावांमध्ये हाणामारी
Clash between brothers over water in Jalgaon जळगाव : पाण्याच्या टाकीतील पाणी वाया जात असल्याने ते बंद कर सांगितल्याचा राग आल्याने भावानेच भावाच्या डोक्यात डोक्यात लोखंडी हातोडी मारली. ही घटना शहरातील खंडेराव नगरात घडली. या प्रकरणी रविवार, 19 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भावाच्या डोक्यात मारली हातोडी
जळगाव शहरातील खंडेराव नगरात मंगलसिंग सुंदरलाल खरारे (37) व त्यांचा भाऊ विजय सुंदरलाल खरारे हे दोन्ही वास्तव्यास आहेत. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास खंडेराव नगर परीसरात पाणीपुरवठा झाल्यानंतर विजय खरारे यांच्या पाण्याच्या टाकीतून पाणी वाया जात असल्याने पाणी बंद करण्याबाबत मंगलसिंग यांनी भाऊ विजय यास सांगितले मात्र त्याचा राग आल्याने विजयने मंगलसिंग यांच्यासोबत वाद घातला तसेच त्यांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण करत मंगलसिंग यांच्या डोक्यात लोखंडी हातोडी मारली. या प्रकरणी जखमी मंगलसिंग खरारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा भाऊ विजय खरारे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक राजेश चव्हाण करीत आहेत.








