गाळणच्या शेतकर्याचा सर्पदंशाने मृत्यू
पाचोरा : पाचोरा तालुक्यातील गाळण बु.॥ येथील शेतकरी भिकन काळे (48) हे शेतात रविवार, 19 रोजी रात्री 11 वाजता गेल्यानंर त्याां विषारी जातीच्या सर्पाने दंश केल्याने त्यांचा मृत्यू झाला.
रस्त्यातच मालवली प्राणज्योत
शेतकरी भिकन काळे यांनी शेतात मका पीक लावले होते व काही दिवसांपासुन रान डुक्कर पिकांची नासधूस करीत असल्याने रविवारी रात्री रानडुक्करांना पळवून लावण्याच्या नादात शेतातील मक्याच्या शेतातून जातांना सकाळी साडे तीन वाजेच्या सुमारास त्यांना विषारी जातीच्या सापाने चावा घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांनी घर गाठले व तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी पाचोरा निघाले असतांनाच त्यांचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. शेतकर्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे.

