भडगावात धूम स्टाईल मंगलपोत लांबवली


Dhoom style Mangalpot extended in Bhadgaon भडगाव : धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 42 हजारांची पोत लांबवली. भडगाव शहरातील हॉटेल जयराजजवळ ही घटना घडली. याबाबत रविवार, 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
अर्चना महेश पाटील (42, एकविरा नगर, भडगाव) या रविवार, 19 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता त्यांच्या नातेवाईकांकडे साखरपुडा असल्याने कार्यक्रम आटोपून त्या घरी पायी येत असताना त्यांच्या मागून दुचाकीने अज्ञात दोन जण येऊन त्यांच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाची 42 हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगलपोत तोडून पळ काढला. महिलांनी आरडाओरड केली परंतु तोपर्यंत भामटे सोन्याची पोत घेऊन पसार झाले. अर्चना पाटील यांनी सायंकाळी 5 वाजता भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या पुढील तपास सहाय्यक फौजदार छबुलाल नाईक करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !