सावखेडासीमला शेतकर्‍याला मारहाण : दोघांविरोधात गुन्हा


Sawkhedaseem farmer assaulted: Crime against both यावल : तालुक्यातील सावखेडासीम येथील एका 52 वर्षीय शेतकर्‍याने माझ्या शेताचा बांध का कोरला ? असे विचारल्याचा राग आल्याने दोघांनी त्यांना जबर मारहाण केली. याच शेतकर्‍याच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
सावखेडासीम येथील पांडुरंग शिवराम पाटील (52म या शेतकर्‍यांचे सावखेडासीम शिवारात शेत असून त्याच्या शेतातील बांध शेजारील शेतकरी प्रकाश सुभाष पाटील व दिलीप सुभाष पाटील यांनी कोरला होता. त्यांना बांध का कोरला अशी विचारणा केली असता या दोघांनी पांडुरंग पाटील यांना जबर मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डाव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले व ते जखमी झाले. त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने प्रकाश पाटील व दिलीप पाटील (रा.सावखेडासीम) या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलि निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !