बिजनेस लोनच्या नावाखाली 23 लाखांचा गंडा : जळगाव सायबर शाखेने महिलेला केली अटक


23 lakh scam in the name of business loan : Jalgaon Cyber Branch arrested a woman जळगाव : जळगावच्या तरुणाला कमी दरात ऑनलाईन कार व बिजनेस लोन मंजूर करून देण्याच्या बहाण्याने 23 लाख 24 हजारात गंडवण्यात आले होते. जळगाव सायबर पोलिसांनी या प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर येथून पूजा सुनील चौहान (रा.मीरारोड, पूर्व मीरा भाईंदर, जि.ठाणे) या महिलेला अटक केली आहे. फसवणुकीच्या रकमेतील 18 लाख 69 हजार रुपये महिलेकडून जप्त करण्यात आले आहेत.

सायबर पोलिसात दाखल होता गुन्हा
आव्हाणे शिवारातील पवार पार्कमधील साहिल वसंतराव गाढे हा तरुण खाजगी नोकरी करतो. साहिलला पूजा चव्हाण तसेच मंगेश चव्हाण असे नाव सांगणार्‍या अनोळखी व्यक्तींचे फोन आले होते. 60 लाख रुपये लोन मंजूर करुन असे सांगत दोघांनी वेळोवेही वेगवेगळ्या टॅक्स, प्रोसेसिंगच्या तसेच इतर बहाण्याने या तरुणाकडून 23 लाख 24 हजार रुपये उकळले होते. दोघेही आपली फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर साहिल गाढे यांनी संबंधितांना पैशांची मागणी केली होती मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जात असल्याने सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.







चार दिवसात गुन्हा उघडकीस
सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिगंबर थोरात, सचिन सोनवणे, गौरव पाटील, गौरव पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पेालीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांनी गुन्ह्यात तांत्रिक सहाय्य केले. संययित मिराभाईंदर येथील असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, राजेश चौधरी, महिला पोलिस नाईक स्वाती पाटील, दिलीप चिंचोले, गौरव पाटील, यांचे पथक मिराभाईंदर येथे रवाना झाले. शनिवार, 18 फेब्रुवारी रोजी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने पूजा चव्हाण हिला अटक करण्यात आल्यानंतर तिने गुन्हयाची कबूली दिली. गुन्ह्यातील 18 लाख 69 हजार रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार दिवसात पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !