जळगावात चोरट्यांनी पानटपरी फोडली


जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा भागातील सोमानी मार्केट जवळील आदित्य पान सेंटरची दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून चोरी प्रयत्न केल्ल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सोमवारी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
सुरेश सुकदेव नरवाडे (48, इंद्रनिल सोसायटी, जळगाव) यांची सोमानी मार्केट येथे आदित्य पान सेंटर नावाचे दुकान आहे. रविवार, 19 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता त्यांनी दुकान बंद करीत घर गाठले मात्र मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद पान सेंटरचे दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. सोमवार, 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता ते दुकानात गेले असता त्यांना दुकानाच्या शटरचे कुलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी दुपारी तीन वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय सपकाळे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !