जळगाव न्यायालय आवारात धारदार चाकू आणणार्‍याला अटक : जळगाव गुन्हे शाखेची कारवाई


Arrested for bringing a sharp knife to the Jalgaon Court premises : Jalgaon Crime Branch action
जळगाव : जळगाव न्यायालयाच्या आवारात मुलाची हत्या करणार्‍यांना गोळ्या घालण्यासाठी आलेल्या पित्याला पोलिसांनी सतर्कतेने अटक केल्याची घटना ताजी असताना जळगावातील एका खूटल्यात साक्षीदारांना धमकावण्यासाठी एक संशयीत धारदार हत्यारासह आल्याची माहिती यंत्रणेला कळताच गुन्हे शाखेने संशयीताच्या मुसक्या बांधल्या. दर्शन उर्फ चंद्रकांत राजकुमार शर्मा (26, रा.कांचन नगर , जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. संशयीताला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगावचे माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव राकेश सपकाळे यांच्यावर पूर्ववैमनस्यातून लाडू गँगने हल्ला करीत धारदार शस्त्राने खून केला होता. या खून खटल्यातील संशयित आरोपींना मंगळवारख 21 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता जिल्हा न्यायालयात तारखेवर आणण्यात आले. या ठिकाणी संशयित आरोपींना भेटण्यासाठी काही तरुणांनी गर्दी केली होती तर या खटल्यातील साक्षीदाराला धमकावण्यासाठी एकाकडे शस्त्र असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर संशयीताच्या मुसक्या बांधण्यात आल्या. संशयीताच्या ताब्यातून धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे.







यांनी केली कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश मेढे, संजय शिवरकर, संतोष मायकल, प्रीतम पाटील, विजय पाटील आदींच्या पथकाने जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळील वाहन पार्किंग परीसरातून संशयीतास ताब्यात घेत जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !