यावल शहरात दोन तरुणांवर ब्लेडने हल्ला


Two youths attacked with blades in Yaval city यावल : शहरातील सुंदर नगरी भागातील दोन तरुणांवर बोरावल गेट भागातील दोघांनी मारहाण करीत त्यांच्यावर ब्लेडव्दारे हल्ला केला. या प्रकरणी यावल पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघा तरुणांविरोधात गुन्हा
यावल शहरातील सुंदर नगरीभागातील यश राजेंद्र पाटील याने यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, तो स्वतःच्या घरासमोर उभा असतांना तेथे ईश्वर गंगाराम भोई व आकाश नामदेव भोई (दोघे रा. बोरावल गेट) हे आले व त्यांनी यश पाटील याला व त्याचा मित्र अतुल देविदास चौधरी याला शिवीगाळ करून ब्लेडने दुखापत केली व आमच्या नांदी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !