क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून देण्याच्या बहाण्याने जळगावातील एकाला 42 हजारांचा गंडा
जळगाव : शहरातील वाहन चालकाला क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून देण्याच्या बहाण्याने भामट्यांनी अॅप डाऊनलोड करण्यास सांगत 31 हजार 640 रुपयात ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी मंगळवार, 21 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अडीच महिन्यानंतर दिली तक्रार
जळगाव शहरातील अयोध्या नगर परीसरातील संदीप अण्णा पाटील (42) हे वाहन चालवून उपजिवीका भागवतात. 24 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास संदीप पाटील हे त्यांच्या घरी असताना त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवर बोलणार्या व्यक्तीने त्यांना क्रेडिट लिमिट वाढवून देण्याचा बहाणा करत मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अॅप डाऊनलोड करताच संदीप पाटील यांच्या खात्यातून 31 हजार 640 रुपये परस्पर संबंधितांनी वळवून घेतले. पैसे परत मिळत नसल्याने तसेच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर याबाबत संदीप पाटील यांनी अडीच महिन्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती . या तक्रारीवरून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.








