पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार : नराधम आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
Abuse of a minor girl in Parola taluka : Murder accused sentenced to life imprisonment जळगाव : पारोळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर नराधम आरोपीने ठार मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला होता. या प्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून आरोपी रवींद्र शामराव पाटील (39, पारोळा तालुका) याच्याविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अमळनेर न्यायालयात न्या.एस.बी.गायधनी यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालल्यानंतर न्यायालयाने आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
अशी आहे खटल्याची पार्श्वभूमी
पारोळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर आरोपी रवींद्र शामराव पाटील (39, पारोळा तालुका) याने दारूच्या नशेत अत्याचार केला होता. फेबु्रवारी 2020 ते जुलै 2020 दरम्यान तसेच 13 फेब्रुवारी 2020 रोजी पीडीतेची आई ही लग्नानिमित्ताने बाहेरगावी गेल्यानंतर आरोपीने अत्याचार केल्याची घटना घडली होती. शिवाय याबाबतची माहिती कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची व स्वतः मरून जाण्याची धमकी देण्यात आली होती. आरोपीचा छळ असह्य झाल्याने पीडीतेने पारोळा पोलिसात तक्रार दाखल केल्याने पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.






पीडीतेच्या साक्षीसह डीएनए अहवाल ठरला महत्त्वाचा
या खटल्यात सरकारी वकील अॅड.किशोर आर.बागुल, मंगरूळकर यांनी
11 साक्षीदार तपासले. त्यात पीडीतेच्या साक्षीसह सरकारी पंच व पिडीतेची आई व डॉ.विद्येश जैन, डॉ.सुप्रिया खांडे, डॉ. गणेश पाटील यांची साक्ष व तसेच न्यायवैज्ञानिक विभाग, नाशिक यांचेकडील डि.एन.ए व रक्त तपासणी अहवाल महत्वाचा ठरला. तपासी अधिकारी रवींद्र बागुल यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. गुन्हा घडल्यापासून आरोपी कारागृहातच आहे. दरम्यान, खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून उदयसिंग साळुंके व हिरालाल पाटील, अमळनेर यांनी काम पाहिल्याची माहिती सहा.सरकारी वकील के.आर.बागुल यांनी दिली.


