साकळीत पाटचारीच्या पाण्यात बुडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
Death of 10th student after drowning in Patchari water in Sakali यावल : तालुक्यातील साकळी येथील दहावीच्या विद्यार्थ्याचा गावालगत असलेल्या पाटचारीत बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निखील मुकुंदा सोनवणे (16, आंबेडकर नगर, साकळी) असे मयताचे नाव आहे.
पोहताना विद्यार्थ्याचा मृत्यू
हतनुरच्या पाटचारीजवळ निखील हा बुधवारी दुपारी गेल्यानंतर पाटचारीत पाणी असल्याने तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परीषदेचे माजी आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांच्यासह नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली व निखील सोनवणे यास पाण्यातुन काढून प्रारंभी साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषीत केले. या प्रकरणी यावल पोलिसात ऋतम सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.



