मधमाशीचा डंख ठरला जीवघेणा : जामनेर तालुक्यातील शेतकर्‍याचा मृत्यू


Bee sting turns fatal : Death of a farmer in Jamner taluka जळगाव : तरुण शेतकर्‍याचा मधमाशीने जिभेला चावा घेतल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास लोंढ्री बुद्रूक ता. जामनेर येथे घडली. अमजद खाँ अस्लम खाँ पठाण(28, रा. लोंढ्री बुद्रूक, ता.जामनेर) असे या मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

श्वास घेणे झाले अशक्य
मिळालेल्या माहितीनुसार, अमजदखाँ पठाण यांचे शेंगोळे रस्त्यावर शेत आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता ते मजुरांसाठी जेवणाचे डबे घेऊन ते दुचाकीने शेतात गेले होते. त्यानंतर घराकडे निघाले होते. वाटेत त्यांच्या जिभेला मधमाशीने चावा घेऊन ती घशात गेली. यामुळे त्यामुळे असह्य वेदना होण्यास सुरुवात झाली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. प्राथमिक उपचार मिळेपर्यत त्यांचा मृत्यू झाला होता.

घटनेने सर्वत्र हळहळ
शेतकर्‍याच्या पश्चात आई, वडील, दोन मुले, मुली व भाऊ असा परीवार आहे. लोंढ्री गावात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. पठाण हे पहूर येथील अजमुद्दीन शेख यांचे जावई होत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !