जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकरांचा राजीनामा अखेर मंजूर


जळगाव : जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्यानंतर आता अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत तत्कालीन महाविकास आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवल्यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यांचा विहित एक वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता मात्र बुधवारी सायंकाळी जिल्हा बँक संचालकांची बैठक झाली. यात अध्यक्ष गुलाबराव देवकर आणि उपाध्यक्ष शामकांत सोनवणे यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले. यानंतर येत्या काही दिवसांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.

आता अध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले लक्ष
मध्यंतरीच्या घटनाक्रमात गुलाबराव देवकर यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता असली तरी असे न होता त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यानंतर अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पदावर रवींद्रभैय्या पाटील, डॉ. सतीश पाटील वा संजय पवार यांच्यापैकी एका मान्यवराची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तर ऐन वेळेस आमदार एकनाथराव खडसे यांचे नाव देखील समोर येऊ शकते तर उपाध्यक्षपदासाठी अमोल चिमणराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !