भुसावळात शेतकर्‍याच्या आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांना रोखला


The police prevented a farmer’s attempt at self-immolation in Bhusawal भुसावळ : भूसंपादीत झालेली जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने बोदवड धोंडखेडा येथील शेतकर्‍याने भुसावळ न्यायालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने बुधवारी बंदोबस्त लावण्यात आला. शेतकरी दयाराम गोविंदा सुनसकर हे दुपारी 12 वाजेच्या सुमारास न्यायालयाच्या आवाराता येताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

पोलिसांच्या सतर्कतेने टळला अनर्थ
धोंडखेडा. ता.बोदवड येथील गट नंबर 32/1985 या जागेचे भूसंपादन झाले असून या जागेचा मोबदला त्यांना अद्यापही मिळाला नाही, त्यामुळे सुनसकर यांनी न्यायालयाच्या आवारात बुधवारी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यापूर्वीही त्यांनी 17 नोव्हेबर 2022 रोजी असाच इशारा दिल्याने त्यावेळी देखील त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !