जळगाव जिल्ह्यातील 15 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या


Transfers of 15 Assistant Police Inspectors in Jalgaon District भुसावळ : जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिस निरीक्षकांसोबत सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेल्या तसेच विनंती बदलीवरून 15 सहाय्यक निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

या अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या
मानव संसाधन विभागातील सुनंदा पुंडलिक पाटील यांची मानव संसाधन विभागात, चाळीसगाव ग्रामीणच्या हर्षा जिभाऊ जाधव यांची चाळीसगाव उपअधीक्षक वाचक (रीडर), भुसावळ तालुक्याचे अमोल पवार यांची भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात, एमआयडीसीचे अमोल भाऊसाहेब मोरे यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात, जिल्हापेठचे किशोर गंगाधर पवार यांची जळगाव शहर पोलिस ठाण्यात, पारोळ्याचे निलेश शरद गायकवाड यांची भुसावळ शहर पोलिस ठाण्यात, भुसावळ शहरचे विनोदकुमार वसंत गोसावी यांची यावल पोलिस ठाण्यात, रावेरचे शीतलकुमार नाईक यांची रावेर पोलिस ठाण्यात, एलसीबीचे जालिंदर पळे यांची सावदा पोलिस ठाण्यात, धरणगावचे गणेश बुवा यांची अडावद पोलिस ठाण्यात, नियंत्रण कक्षाचे रामेश्वर मोताळे यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली.

विनंतीवरून या अधिकार्‍यांच्या बदल्या
दरम्यान, विनंती बदलीवरून अडावदचे किरण दामोधर दांडगे यांची जिल्हापेठ पोलिस ठाण्यात, जिविशाचे संदीप अशोक हजारे यांची शहर वाहतूक शाखेत, एमआयडीसीचे प्रमोद कठोर यांची धरणगाव पोलिस ठाण्यात तसेच भुसावळ शहरचे संदीप उत्तमराव दुनगहू यांची मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. सुदाम काकडे, शनीपेठ पोलीस ठाणे अमोल देवढे यांची विनंती वरून बदली करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !