कर्जमुक्तीसाठी आधारकार्ड कर्ज खात्याशी लिंक करा

रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांचे शेतकर्यांना आवाहन
रावेर : रावेर तालुक्यातील शेतकर्यांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी ग्राम पंचायतीमध्ये तलाठी यांच्याशी संपर्क करून आवश्यक ती कागदपत्र जमा करावे तसेच आधारकार्ड सुध्दा कर्ज खात्याशी लिंक करावे, असे आवाहन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे. ज्या शेतकर्यांनी शेतीशी निगडित कामाकरीता व्यापारी बँक, जेडीसीसी बँक यांच्याकडून सन 2015-16 व 2018-19 या सलग चार वर्षात थकबाकीदार असलेल्या शेतकर्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. तालुक्यात दुष्काळसदृश परीस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. तालुक्यातील शेतकर्यांचे रतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याने ते कर्जाची परतफेड करू न शकल्याने थकबाकीदार शेतकर्यांना आता कर्जमाफी योजनेचा लाभ होणार आहे.


