अकलूदच्या तरुणावर चाकूहल्ला : संशयित आरोपी चुलतभावांना अटक


Knife attack on youth of Aklud : Suspected accused cousins arrested भुसावळ : शहरापासून जवळच असलेल्या अकलूद येथे 24 वर्षीय तरुणावर जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा संशयीतांनी शिविगाळ, मारहाण करीत चाकूहल्ला केला होता. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास टोल नाक्याजवळ घडली होती. या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी बुधवारी रात्री दोन आरोपींना अटक केली आहे. संशयिताना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता 28 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

तरुणाची प्रकृती गंभीर : दोघांना अटक
मुकेश रमेश तायडे (32, दुसखेडा, ह.मु.अकलूद) व शुभम अशोक सपकाळे (24, अकलूद) हे दुचाकीवरून जात असताना जुन्या वादातून संशयित आरोपींनी चाकूहल्ला केल्याने शुभम हा तरुण गंभीर जखमी झाला होता. मंगळवारी सायंकाळी अकलूदजवळील टोल नाक्यासमोर ही घटना घडल्यानंतर आरोपीच्या घरवजा टपरीला जमावाने पेटवून दिले होते. चाकूहल्यात जखमी झालेल्या शुभम सपकाळे या तरुणावर भुसावळातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले. फैजपूर पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासचक्रे फिरवत बुधवारी रात्री अविनाश शामलाल गुप्ता व भोला उर्फ राज रामचरण गुप्ता (दोन्ही रा.अकलूद, ता.यावल) या चुलतभावांना अटक केली आहे.







संशयीतांना 28 पर्यंत कोठडी
संशयीतांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता 28 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहा.निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !