रेल्वे ब्लॉकचा फटका : सोमवारी महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच धावणार


Hit by railway block : Maharashtra Express will run only till Pune on Monday भुसावळ : पुणे विभागात रेल्वेच्या सुरू असलेल्या कामांमुळे सोमवार, 27 रोजी गोंदीया येथून कोल्हापूरसाठी सुटणारी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ही पुण्यापर्यंतच चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

रेल्वे प्रवाशांची होणार गैरसोय
पुणे विभागातील सातारा-कोरेगाव स्थानकादरम्यान तांत्रीक कामामुळे गाडी क्रमांक 11040 व 11039 महाराष्ट्र एक्स्प्रेस कोल्हापूर-पुणे कोल्हापूर स्टेशन दरम्यान रद्द करण्यात आली असून ही गाडी 11040 गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी 27 फेबुवारीला केवळ गोंदिया ते पुणे दरम्यान चालवण्यात येणार आहे. पुणे ते कोल्हापूर या दरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली तर मंगळवार, 28 रोजी 11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ही कोल्हापूरहुन सुटणारी गाडी पुणे स्थानकावरून सुटणार आहे. कोल्हापूर ते पुणे दरम्यान ही गाडी रद्द करण्यात आल्याची रेल्वे प्रशासनाने दिली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !