मुक्ताईनगर मतदारसंघात पाच कोटींच्या निधीला मंजुरी
मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने मतदारसंघातील गावांमधल्या मागासवर्गीय वस्त्यांमध्ये विविध विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन 2022-23 या वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड, रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये विविध विकास कामांसाठी पाच कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
या कामाला मंजुरी
या निधीतून मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे बुद्ध विहार, सुशोभीकरण, सामाजिक सभागृह, स्मशानभूमी बांधकाम, काँक्रिटीकरण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सुशोभीकरण, रस्ता व गटार बांधकाम अशी कामे मंजूर झाली आहे. या निधीचा विनीयोग पिंप्रीपंचम, कर्की, नायगाव, हरताळे, सालबर्डी, कोथळी, वढोदा, हलखेडा, सुळे, काकोडा, उचंदा, मेळसांगवे, चिंचोल, अंतूर्ली, तरोडा, कुंड, बोदवड, वाकी, बोरगांव, धुळे, घोडसगाव, चिचखेडा बू, खामखेडा, चांगदेव, धामणगाव, पातोंडी, मानेगाव, भोटा, पारंबी, कुर्हा, काकोडा, साळशिंगी, नाडगाव, कुर्हा हरदो, मनुर बू, मानमोडी, शेलवड, विचवा, घानखेड, हिंगणे, जलचक्र, लोणवाडी, येवती, एणगाव, मस्कावदसीम, मस्कावद बू, , मस्कावद खूर्द , ऐनपूर, तांदलवाडी , कांडवेल, पुरी , गाते, राजुरा या गावांमध्ये करण्यात येणार आहे.

