पत्नी नांदण्यास न आल्याच्या रागातून खून : करगाव तांड्यातील आरोपी पतीला जन्मठेप


Murder due to anger of wife not coming to HOME : Accused husband in Kargaon Tandya sentenced to life imprisonment चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांडा येथे माहेरी आलेल्या पत्नीचा पतीने कोयत्याने वार करीत खून केला होता. पत्नी नांदण्यास येत नसल्याच्या कारणातून ही घटना घडली होती. या खटल्याची जळगाव जळगाव जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.एस.वावरे यांच्या न्यायासनापुढे सुनावणी चालली. आरोपी युवराज कपूरचंद जाधवविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास जन्मठेपेसह दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

नांदण्यास येत नसल्याच्या कारणातून केला खून
चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेडा तांडा येथे युवराज कपूरचंद जाधव हा आपल्या पत्नीसह वास्तव्यास होता. गेल्या अनेक महिन्यांपासून युवराज जाधव व पत्नी कविता यांच्यात वाद निर्माण झाल्याने पत्नी कविता ही दोन मुलांसह माहेरी चाळीसगाव तालुक्यातील करगावतांडा येथे निघून गेल्या होत्या. पत्नी नांदायला येत नाही म्हणून याचा राग मनात धरून युवराज जाधव याने 16 जून 2022 रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास तिच्या घरी आला. त्यावेळी त्याची पत्नी कविता ही दोन्ही मुलांसह गच्चीवर झोपली असताना संशयित आरोपी युवराज जाधव याने पत्नी कविताच्या छातीवर वार करून तिचा खून केला. या संदर्भात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.







मुलांची साक्ष ठरली महत्त्वाची
खून प्रकरणाचा खटला जळगाव जिल्हा न्यायाधीश बी.एस.वावरे यांच्या न्यायालयात चालवण्यात आला. मुलगा आणि मुलगी यांची साक्ष प्रत्यक्षदर्शी म्हणून महत्त्वाच्या ठरल्या. यामध्ये मुलगी मयुरी हिने घटना जशीच्या तशी सांगितली. आरोपी युवराज जाधव याला न्यायालयाने दोषी ठरविले असून जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी हा 27 जून 2020 पासून कारागृहामध्ये असल्याने तेव्हापासून शिक्षेच्या कालावधीचा विचार करण्यात येईल, असेही न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.पंढरीनाथ चौधरी यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून तुषार मिस्त्री यांचे सहकार्य केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !