जळगावातील अल्पवयीन तरुणीशी विवाह : अत्याचारातून तरुणी गर्भवती

पतीसह सासरच्यांविरोधात जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा


Marriage to a minor girl in Jalgaon: Young woman becomes pregnant due to torture जळगाव : जळगावातील एका भागातील अल्पवयीन तरुणीशी पळवून विवाह केल्यानंतर तिच्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आल्याने त्यातून पीडीता गर्भवती राहिली आहे शिवाय तरुणीचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आल्याने पीडीतेने या बाबत पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्याने सासरच्यांविरोधात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

पळवून नेत केला विवाह
जळगाव शहरातील एका भागात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी आई वडीलांसह वास्तव्याला आहे. जळगाव तालुक्यातील एका गावातील तरुणाने तिला 25 जुलै 2022 रोजी दुचाकीवर बसवून पळवून नेले. तरूणाने त्याच्या बहिणीकडे नेवून तिच्यासोबत लग्न केले. या लग्नाला पीडीत मुलीच्या आईचा विरोध होता. याचा राग मनात ठेवून पीडीत मुलीला मारहाण करून शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला व सातत्याने अत्याचार करण्यात आल्याने पीडीता त्यातून गर्भवती राहिली. हा प्रकार सहन न झाल्याने पिडीत मुलगी ही माहेरी निघून आली.







यांच्याविरोधात गुन्हा
माहेरच्या मंडळींना सोबत घेत पीडीतेने गुरुवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पती घनश्याम दिलीप पवार, सासरे दिलीप सीताराम पवार, सासु शारदा दिलीप पवार, नणंद रेखाबाई लहू पवार, नंदोई लहू पवार (सर्व रा.जळगाव तालुका) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !