वाहन न देता 46 हजार स्वीकारून केली फसवणूक : सातारा जिल्ह्यातील एकाविरोधात गुन्हा


46,000 fraud without giving the vehicle: A case against one in Satara district धरणगाव : वाहनाचा सौदा करूनही वाहन न देता वा पैसेही परत न करता अमळनेर शहरातील प्रौढाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील मारुल हवेलीतील एकाविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाहन न देता केली फसवणूक
अमळनेर शहरातील किरण नामदेव धनगर (45, शिरूड नाका, गोहिल नगर, अमळनेर) यांनी संशयित राहुल कुमार दामोदर हिरवे (मारुल हवेली, ता.पाटण, जि.सातारा) यांच्याशी वाहनाबाबत धरणगाव शहरात 8 एप्रिल 2018 रोजी सौदा केला होता. या सौद्यापोटी 46 हजारांची रक्कमही देण्यात आली मात्र हिरवे यांनी वाहन न देता फसवणूक केली शिवाय दिलेली रक्कम देण्यासही टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर धनगर यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिल्यानंतर हिरवे यांच्याविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय संतोष थोरात करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !