मराठी प्रमाण भाषेत संवाद होणे गरजेचे -प्रा.डॉ.शिल्पा पाटील


भुसावळ : आपल्या मातृभाषेतून जेवढा सुसंवाद घडतो तेव्हा अन्य भाषेतून तो घडत नाही. इंग्रजी ही जरी ज्ञानभाषा असली तरीदेखील मराठी भाषा आपण बोलत असताना तिच्याबद्दल अभिमान आपल्या वाणीत झळकला पाहिजे आणि दिवसेंदिवस आपल्या वापरामध्ये अन्य भाषेतील शब्द येतात ते शब्द कमी होऊन मराठीतील प्रमाण शब्द वाढणे गरजेचे आहे. अधिकाधिक संवाद आणि संवादाची सुकरता ही केवळ आपल्या मातृभाषेतूनच होत असते, असे मत उपप्राचार्य डॉ.शिल्पा पाटील यांनी व्यक्त केले. श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ.पाटील बोलत हेात्या.

यांची होती उपस्थिती
मराठी विभागाचे प्रा.विकास सपकाळे, कला व वाड़मय मंडळ समिती प्रमुख प्रा.निलेश गुरुचळ, डॉ.गिरीश कोळी, प्रा.अक्षरा साबळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.विकास सपकाळे यांनी केले. मराठी भाषा संवर्धनाची गरज व महाराष्ट्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यासाठी केलेले प्रयत्न मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त घेतल्या जाणार्‍या कार्यक्रमांची त्यांनी माहिती दिली. प्रास्ताविक प्रा.विकास सपकाळे व सूत्रसंचालन सोनल चौधरी तर आभार कला व़ाडमय मंडळाचे अध्यक्ष प्रा.निलेश गुरचळ यांनी मानले.


कॉपी करू नका.