भुसावळात शॉर्ट सर्किटने घराला आग : संसारोपयोगी साहित्य खाक
House fire in Bhusawal due to short circuit : Khak of household materials भुसावळ : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवरील रेल्वेच्या पीओएच कॉलनीतील रहिवासी तथा रेल्वे कर्मचारी अमरींदर कुमार यांच्या (आरबी सेकंड 1214/बी) या घराला शॉर्ट सर्कीटमुळे गुरूवारी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास आग लागली. पाहता-पाहता आगीचा भडका वाढत गेल्याने त्यात संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
अग्निशमन दलाची धाव
कंडारी येथील पीओएच कॉलनीतील रहिवासी विरेद्रकुमार यांच्या रेल्वे क्वॉर्टरमध्ये गुरूवारी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घरातील इलेक्ट्रीक वायरींग जळत असल्याचा वास आला व काही वेळेतच घरातील फ्रिजने पेट घेतला. यावेळी घरात स्वयंपाक सुरू होता. घरात विरेंद्रकुमार यांची पत्नी व मुलगी होती. घरात स्वयंपाक सुरू असल्याने सिलेंडरने सुध्दा पेट घेतल्याने घरात आग मोठ्या प्रमाणावर पसरली. आगीचे वृत्त कळताच आजूबाजूच्या घरांमध्ये एकच धावपळ उडाली. पीओएच कॉलनीतील रेल्वे कर्मचारी सुध्दा आग विझविण्यास धावून आले. यावेळी कंडारी येथील पोलिस पाटील रामा तायडे यांनी पालिकेच्या अग्निशमन केंद्र आणि शहर पोलिसांना फोन लावून माहिती दिली. पालिकेच्या अग्निशमन केद्राच्या बंबाने आग आटोक्यात आणली. आग लागल्याने पीओएच कॉलनीतील वीज पुरवठा सर्वत्र खंडीत करण्यात आला.
जुन्या वायरींगमुळे आग
या परीसरात असलेल्या रेल्वेच्या निवासस्थानांमधील इलेक्ट्रीकची फिटींग ही अत्यंत जुनी झाली आहे. रेल्वे प्रशासनातील वरीरष्ठ अधिकार्यांनी लक्ष देऊन जुनी वायरींग बदलवून टाकावी, अशी मागणी रेल्वे कर्मचार्यांच्या परीवारातील सदस्यांकडून होत आहे.



