मुंबई-रीवा आणि पुणे-जबलपूर साप्ताहिक विशेष ट्रेन धावणार
Mumbai-Rewa and Pune-Jabalpur weekly special trains will run भुसावळ : उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मुंबई-रीवा आणि पुणे-जबलपूर दरम्यान विशेष ट्रेनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दर शुक्रवारी धावणार मुंबई-रीवा स्पेशल ट्रेन
02188 मुंबई-रीवा स्पेशल ट्रेन दर शुक्रवारी धावणार असून 30 जूनपर्यंत ती चालवण्यात येणार आहे. 02187 रेवा-मुंबई स्पेशल ट्रेन दर गुरुवारी धावणार असून तिला 29 जुनपर्यंत चालवण्यात येणार आहे. 02131 पुणे-जबलपूर स्पेशल प्रत्येक सोमवारी धावणार असून ती 26 जून तर 02132 जबलपूर-पुणे स्पेशल प्रत्येक रविवारी धावणार असून ती 25 पर्यंत चालवण्यात येणार आहे. गाडीच्या धावण्याचे दिवस, वेळ, रचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.



