भुसावळातील बँकेचे दोन कोटीत तीन पत्ती अॅपमध्ये उडवणार्या सहा.बँक व्यवस्थापकाची कोठडीत रवानगी
Bank of India fraud case of two crores in Bhusawal : Bank manager sent to custody भुसावळ : तीनपत्ती अॅपच्या नादाच्या सवयीमुळे भुसावळातील बँक ऑफ इंडियाला सुमारे दोन कोटींचा गंडा सहाय्यक व्यवस्थापक योगेश प्रकाश भिलाणे (जळगाव) याने घातला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होवून त्यास अटक करण्यात आली होती. शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीला भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
अधिकार्यांसह कर्मचार्यांच्या वाढल्या अडचणी
योगेश प्रकाश भिलाणे हा भुसावळातील बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत असताना त्यास तीनपत्ती अॅपचे व्यसन लागले. पैसे कुठून आणावेत या विवंचनेत त्याने बँकेतील पदाचा गैरवापर करीत वापरात नसलेल्या खात्यांची माहिती स्वतःच्या लॉगीन पासवर्डद्वारे शोधली शिवाय विविध पेन्शनर यांनी आपली एफ.डी.ची रक्कम गेल्या अनेक वर्षानंतरही काढली नसल्याची बाब हेरत अशा खात्यांमधील रक्कम आपल्या पत्नीच्या बनावट नावाने उघडलेल्या खात्यात वळती केली शिवाय पेन्शनर महिला मृत झाल्यानंतर (डेड क्लेम) संबंधिताचे खाते बंद न करता या खात्यातही रक्कम वळवली. बँकेलची दोन कोटी एक लाख 20 हजार 934 रुपयात फसवणूक झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व तो जळगाव गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली होती. शुक्रवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यास भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता संशयीत भिलाणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास डीवायएसपी भास्कर डेरे व सहकारी करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात बँक अधिकारी व कर्मचारी अडकण्याच्या शक्यता वर्तवली जात असल्याने खळबळ उडाली आहे.



