भुसावळात एकाला पिस्टल लावत फायटरने मारहाण : खरात बंधूंविरोधात गुन्हा
A fighter assaulted a man with a pistol in Bhusawal: Crime against Kharat brothers भुसावळ : शहरातील एकाला गावठी कट्टा लावून डोक्यात फायटरने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना स्टेशन रोडवरील रेल्वे गार्डनजवळ गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयित राजन रवींद्र खरात, हंसराज रवींद्र खरात व आतीश रवींद्र खरात यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
इसार खान अनदर खान (बिलाल मशीदजवळ, ग्रीन पार्क, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास ते दुचाकीने घराकडे निघाल्यानंतर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे गार्डनजवळ तिघा संशयित आरोपींनी रस्ता अडवत डोक्याला कट्टा लावून फायटरने मारहाण करीत शिविगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शुक्रवारी रात्री खान यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिघा संशयीतांविरोधात बाजारपेठ पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश मुर्हेकरीत आहेत.



