ACB TRAP BODWAD बोदवड पोलिस ठाण्यातील लाचखोर हवालदारासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात


Punter along with corrupt constable of Bodwad police station in Jalgaon ACB net भुसावळ : खंडणीच्या गुन्ह्यात बी फायनल पाठवण्यासह चॅप्टर केस एलसीबीऐवजी स्थानिक स्तरावर करण्यासाठी 20 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 16 हजारांची लाच स्वीकारणार्‍या पंटरासह बोदवडमधील हवालदारास जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. शनिवार, 25 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास बोदवड तहसील कार्यालयाच्या आवारात हा सापळा यशस्वी करण्यात आला. हवालदार वसंत नामदेव निकम (52, आयटीआय कॉलनी, जामनेर) व खाजगी पंटर एकनाथ कृष्णा बावस्कर (65, रा.जलचक्र बु.॥) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

असे आहे लाच प्रकरण

बोदवड तालुक्यातील तक्रारदार हे पत्रकार आहेत. त्यांच्यासह इतर तिघा पत्रकारांविरोधात 20 डिसेंबर 2022 रोजी खंडणीचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास हवालदार वसंत निकम यांच्याकडे होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तक्रारदारांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतल्यानंतर या गुन्ह्यात मदत करून ‘ब’ फायनल पाठविण्यासाठी तसेच दाखल गुन्ह्यातील आरोपींना एलसीबी कार्यालय जळगाव येथे चॅप्टरसाठी न पाठवता तहसील कार्यालय, बोदवड येथे हजर करून चॅप्टर केस करून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे 20 हजारांची मागणी करण्यात आली व त्यात तडजोड होवून 16 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर शनिवारी सकाळी सापळा रचण्यात आला. बोदवड तहसील कार्यालयाच्या आवारात एकनाथ बावस्कर यांनी लाच स्वीकारताच निकम यांनादेखील अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, सुरेश पाटील, हवालदार सुनील पाटील, अशोक अहिरे, रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !