यावल-बोरावल रस्त्यावर भरधाव अ‍ॅपे रीक्षा उलटली : 12 प्रवासी जखमी, दोघे गंभीर


Speeding app rickshaw overturns on Yaval-Boraval road: 12 passengers injured, two seriously यावल : यावल-बोरावल रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणार्‍या अ‍ॅपे रीक्षाचा उलटून झालेल्या अपघातात 12 प्रवाशी जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सायंकाळी हा अपघात घडला.

अनियंत्रीत रीक्षा उलटली
यावल-बोरावल रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी प्रवासी वाहतूक करणारी अ‍ॅपे (क्रमांक एम.एच.19 ए.ई. 7128) ही प्रवासी घेवून यावलकडून बोरावलला जात असताना बोरावल गावाजवळच अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला कलंडली. या अपघातामध्ये कमलबाई मधुकर पाटील (60), गुलाबचंद निशाद (72, नाशिक), मजिला दरसिंग पावरा (23), लेदलीबाई कृष्णा बारेला (45), मनीषा खंडू महाजन (42), वनदा गणपत बारेला (23), कमलबाई भास्कर धनगर (55), अशोक देविदास महाजन, संगीता अनिल पाटील (32), निर्मला रामदास भालेराव (50) व उषाबाई सुरेश धनगर (50) असे 12 जण जखमी झाले. या सर्व जखमींना तातडीने यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण, डॉ.इरफान खान, अधिपरिचारीका मंजुषा कोळेकर, संजय जेधे, रऊफ खान यांनी उपचार केले. यातील गुलाबचंद निशाद व कमलबाई यांना जबर दुखापत झाल्यामुळे या दोघांना प्रथमोपचार करून तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !