‘सातपुड्यातील आदिवासी भिल्ल’ पुस्तकाचे प्रकाशन


वरणगाव : फैजपूर पालिका संचलित असलेल्या म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत राबविण्यात आलेल्या सातपुड्यातील आदिवासी भिल्ल संस्कार व संस्कृती अभ्यास उपक्रम सातपुडा पर्वत शोध मोहीम संकल्प पूर्ण करून समाजाभिन्मुख व्यक्तिमत्वातून या शाळेचे शिक्षक बी.डी महाले यांनी लिहिलेल्या सातपुड्यातील आदिवासी भिल्ल पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या थाटात म्युन्सीपल हायस्कूलमध्ये नुकतेच झाले.

यांची होती उपस्थिती
प्रसंग खासदार रक्षा खडसे, महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, शालेय समिती अध्यक्ष शेख कुर्बान, शिक्षण समिती सभापती शकुंतला भारंबे, भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलिमखां मण्यार, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, अमोल निंबाळे, प्रभाकर सपकाळे, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अमिता चौधरी, नगरसेविका नयना चौधरी, फातेमाबानो शेख रईस मोमीन, मलक साईमाबी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, एपीआय प्रकाश वानखडे, आसेम संस्थापक अध्यक्ष राजू तडवी, साहित्यीक डॉ.मनोहर सुरवाडे, देवेंद्र साळी, मुख्याध्यापक आर.एल.आगळे, पर्यवेक्षक एस.ओ.सराफ, युनूस तडवी, मनोज कापडे, रवींद्र होले, शेख इरफान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कलाशिक्षक ए.के.महाजन तर आभार पर्यक्षक एस.ओ.सराफ यांनी मानले.


कॉपी करू नका.