जळगावातील विवाहितेचा छळ : पतीसह चौघांविरोधात गुन्हा


Harassment of married woman in Jalgaon : Crime against four including husband जळगाव : माहेरून पैसे न आपल्याने शहरातील विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह चौघांविरोधात जळगाव शहर पोलिसात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील शाहू नगरातील रुक्सार समीर पिंजारी (21) यांचा विवाह शाहू नगरातील समीर सत्तार पिंजारी यांच्याशी झाल्यानंतर लग्नानंतरच्या काही दिवसांनी पतीसह सासरच्या मंडळींनी रुक्सार हिने माहेरुन आई वडीलांकडून पैसे आणावेत, अशी वारंवार मागणी करण्यात आली मात्र मागणी पूर्ण न झाल्याने रुक्सार हिला वेळावेळी शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच शारीरीक तसेच मानसिक छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून रुक्सार या माहेरी निघून आल्या व त्यांनी जळगाव शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर पती समीर सत्तार पिंजारी, सासू रेहाना पिंजारी, सासरे सत्तार शाहबुद्दीन पिंजारी, दीर जमीर सत्तार पिंजारी (शाहू नगर) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला पोलिस हवालदार अनिता वाघमारे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !