होय, मी गद्दारी केली कारण….!, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जळगावात प्रांजळ कबुली
Yes, I committed treason because…., Guardian Minister Gulabrao Patil made a frank confession in Jalgaon जळगाव : उद्धव ठाकरे यांच्या गटातून बाहेर पडलेल्या शिंदे समर्थकांवर ठाकरे गटाकडून नेहमीच गद्दारीचा ठपका ठेवला जातो. या पार्श्वभूमीवर आज प्रथमच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी होय, मी गद्दारी केली कारण मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जळगावातील बिलखेडा येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
एक मराठा मुख्यमंत्री होण्यासाठी गद्दारी केली
आपल्या खास शैलीत गुलाबराव म्हणाले की, होय, मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली. विरोधाला विरोध करायचा पण मतदारसंघात काही काम करायचं नाही. बिलखेडेत साधी एक मुतारी हे लोक बांधू शकले नाहीत आणि भाषणं ठोकतात, असा जोरदार हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला. आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो. हो तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असल्याचेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
तर आम्हाला चितपटसाठी करावेत प्रयत्न
गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावरही टिका केली होती. गद्दार, गद्दार ऐकून आता लोकही बोअर झाले आहे, पिक्चर लागून सात महिने झाल्याने लोकही आता बोअर झाले आहेत. तुम्हाला काय मिळालंय, नाही मिळालंय, लोकांनी काय गद्दारी केली हे आता सगळं संपलय. त्यांनी आता नवीन उभारीने पक्ष बांधला पाहिजे आणि आम्हाला चितपट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी निवडणुकीला आणि निवडून यायला महत्त्व आहे. तुम्ही तुमचे लोक निवडून आणा, आम्ही निवडून येण्याचा प्रयत्न करू, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.