जळगावसह पाचोरा व चाळीसगावात अद्यावतीकरणातून प्रवाशांना सुविधा

खासदार उन्मेश पाटील यांना रेल्वे प्रशासनाची ग्वाही : बैठकीत मांडल्या समस्या


Facilitation for passengers through upgradation in Jalgaon along with Pachora and Chalisgaon भुसावळ : चाळीसगाव मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी डीआरएम कार्यालयात डीआरएम एस.एस.केडीया यांची भेट घेत चाळीसगावसह पाचोरा व जळगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे समस्यांबाबत चर्चा केली. तीनही स्थानकांवर लवकरच अद्यावतीकरणाचे काम करण्यात येणार असून प्रवाशांना सुविधा मिळतील, अशी ग्वाही डीआरएम एस.एस. केडिया यांनी दिली.

प्रवाशांना मिळणार विविधांगी सुविधा
भुसावळ विभागाला यंदा बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला असून त्या निधीच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांचे अद्यावतीकरण केले जाणार आहे. जळगाव-मनमाड तिसरी लाईन, चौथ्या रेल्वे लाईनीस मंजूरी, रेल्वे स्थानकांचे अद्यावतीकरण केले जाणार आहे. यासाठी आर्कीटेक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या रेल्वे स्थानकांवर विविध सुविधा प्रवाशांना दिल्या जाणार आहे. पाचोरा-जामनेर या नवीन मार्गासाठी 50 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याबाबतही खासदार पाटील व डीआरएम केडीया यांच्यात चर्चा झाली.

यांची बैठकीला उपस्थिती
भुसावळ विभागातून बायरोड होणारी मालाची निर्यात ही रेल्वेने होण्यासाठी नियोजन करावे, जळगाव येथून दाळी या बायरोड मुंबईत जात असतात, त्या रेल्वेने वेळेपूर्वीच पोहोचतील त्या दृष्टीने नियोजन केल्यास व्यापार्‍यांचा सुध्दा फायदा होणार आहे. त्यातून रेल्वेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. यासाठी नियोजन करावे, असे खासदार पाटील यांनी सूचीत केले. यावेळी एडीआरएम सुनील सुमंत, कौशल्यकुमार, सीपीएम नवीन पाटील, सिनीयर डीसीएम डॉ. शिवराज मानसपुरे तसेच खासदार पाटील यांच्या सोबत जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सदस्य चंद्रशेखर अत्तरदे आदी उपस्थित होते, डीआरएम कार्यालयात ही बैठक तब्बल दोन तास सुरू होती.

हुतात्मा मनमाडमार्गे चालवा
भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी कर्जत जवळील कामांमुळे दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्याने ही गाडी मनमाड, दौंडमार्गे पुण्यासाठी सुरू करावी, जेणे करून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होईल. गरीब प्रवाशांच्या खिश्याला बसणारा फटका वाचणार असल्याने ही गाडी मनमाड, दौंडमार्गे सुरू करावी, अशी मागणी सुध्दा खासदार पाटील यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !