विवाहितेची छेड काढल्याच्या संशयातून मारहाण : अपमानाने खचलेल्या चाळीसगाव तालुक्यातील तरुणाची आत्महत्या


Beating up on the suspicion of molesting a married woman: A young man in Chalisgaon taluk commits suicide after being humiliated चाळीसगाव : विवाहितेची छेड काढल्याच्या संशयातून तालुक्यातील पातोंडा येथील 38 वर्षीय तरुणाला मारहाण करीत शिविगाळ करण्यात आली होती. हा अपमान सहन न झाल्याने तरुणाने घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनेप्रकरणी दोघांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा गावातील तुषार बाबूलाल माळी (38) या तरुणाने विवाहितेची छेड काढल्याच्या संशयातून त्यास निलेश सुरेश वाघ व सुरेश वाघ यांनी गुरुवारी सायंकाळी आरोपीच्या घरी व हनुमान मंदिराजवळ शिविगाळ करीत मारहाण केली होती. या प्रकारानंतर अपमानीत झालेल्या तरुणाने घरी घेत मध्यरात्री गळफास घेत आत्महत्या केली. संशयितांनी केलेल्या मारहाणीमुळे व खोट्या आळमुळे मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप करीत कमलबाई बाबूलाल माळी (55, पातोंडा) यांनी करीत चाळीसगाव पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !