देहव्यापारासाठी जळगावातील अल्पवयीन मुलीचा वापर : तिघांना अटक


Use of minor girl in Jalgaon for prostitution: Three arrested जळगाव : देहव्यापारासाठी जळगावातील अल्पवयीन मुलीचा वापर केल्याप्रकरणी जळगावातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी पोलिसांनी जळगावसह चाळीसगावातील आरोपींना अटक केली आहे.

अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले
जळगाव शहरातील एका भागातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. 7 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता नितू उर्फ जोया राजू बागडे (रा.जळगाव), ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार (दोघे रा. आनंदवाडी, चाळीसगाव) यांनी अल्पवयीन मुलीला चाळीसगाव येथे बोलावून तिला सोडा पाजून वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले. त्यानंतर पुन्हा शुक्रवार, 10 फेब्रुवारी रोजी कपडे व मोबाईल देण्याचे आमिष दाखवत चाळीसगावला घेवून गेले. तिथे 23 फेब्रुवारीपर्यंत रोज रात्री पुन्हा सोडा पाजून वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडण्यात आले. नंतर पोलिस येणार असल्याचे सांगून तिघांनी तिला रेल्वेत बसवून जळगावला पाठविले. घाबरलेल्या अवस्थेत तिने हा सगळा प्रकार आईला सांगितला.

यांच्याविरोधात गुन्हा दाखल
पीडीत मुलीने आईसह एमआयडीसी पोलिसात धाव घेवून तिघांविरोधात तक्रार दिल्यानंतर नितू उर्फ जोया राजू बागडे (जळगाव), ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार (दोघे रा. आनंदवाडी, चाळीसगाव) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !