भुसावळात पाणीपुरी विक्रेत्यास मारहाण करीत रोकड लुटली : दोघांविरोधात गुन्हा


भुसावळ : शहरातील राम मंदिर वार्डातील रहिवासी असलेल्या पाणीपुरी विक्रेत्यास पाणीपुरी खाल्ल्यानंतर पैसे मागितल्याच्या रागातून पाणीपुरी विक्रेत्याच्या खिशातील एक हजार शंभर रुपयांची रोकड हिसकावून विक्रेत्यास मारहाण करण्यात आली तसेच त्याची दुकीचा घेवून संशयित पसार झाले. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
शहराातील राम मंदिर वॉर्डातील कन्हैया जगन्नाथ बायाम याच्या पाणीपुरीच्या दुकानावर शहरातील वाल्मीक नगरातील रहिवासी केवल अनिल टाक याने शुक्रवारी ात्री साडेदहा वाजता पाणीपुरी खाल्ली मात्र विक्रेत्याने पाणीपुरीचे पैसे मागितल्याचा राग टाक याला आल्याने त्याने विक्रेता कन्हैया यांच्या तोंडावर मारहाण केली, तसेच चाकूचा धाक दाखवून अन्य दोन इसमांना विक्रेत्याला मारहाण करा, असे सांगत पाणीपुरी विक्रेता कन्हैया याच्या खिशातील एक हजार 100 रूपये काढून हिरोहोंडा (एम.पी.06 एम.एफ.5385) घेवून पथ काढला. या घटनेप्रकरणी कन्हैया बायाम याच्या फिर्यादीवरून टाकसह अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र सपकाळे हे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !