रावेरात लिंब वृक्षाची लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त
Truck seized for illegal transport of lemon tree wood in Raver रावेर : लिंब लाकडांची अवैधरीत्या कत्तल करून लाकडाची वाहतूक करणारा ट्रक रावेर वनविभागाच्या पथकाने जप्त केल्याने लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रविवारी पहाटे ट्रक (एम.एच.19 झेड.7862) ट्रकव्दारे विनापरवाना जळावू वृक्षाचे वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती माहिती रावेर वनविभागाच्या पथकाने मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. संशयित ट्रक जप्त करण्यात आला असून त्यातील तीन लाख व बारा हजार रुपये किंमतीचे जळावू सरपण जप्त करण्यात आले. या प्रकरणी ट्रक चालक शेख कलीम शेख कबीर (रा.रावेर) विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई धुळे वनसंरक्षक दिगंबर पगार, यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनपाल रवींद्र सोनवणे, वनपाल अरुणा ढेपले, वाहनचालक विनोद पाटील यांच्या पथकाने केली आहे तपास रावेर वनपाल रवींद्र सोनवणे करीत आहे.

