चाळीसगावात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांना अटक !


The then Special Public Prosecutor Praveen Chavan was detained by the police in Chalisgaon चाळीसगाव : जळगाव शहरातील निलेश भोईटे यांच्या घरावर अवैध छापा टाकल्याप्रकरणी जळगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित तथा तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांना चाळीसगाव पोलिसांनी ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात सोपवले आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात अ‍ॅड.प्रवीण चव्हाणांवर कारवाई
7 ऑक्टोंबर 2022 रोजी जळगाव शहर पोलिसात निलेश भोईटे यांनी तक्रार दिली होती. भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्याविरुद्ध निंभोरा पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा पुणे कोथरूड येथे वर्ग करण्यात आला. या गुन्ह्यात कोथरूड पोलिसांनी जळगावच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने भोईटे यांच्या जळगावातील भोईटे नगरातील घरी 9 जानेवारी 2022 रोजी छापा टाकला. यावेळी भोईटे घरी नव्हते. या कारवाईत पोलिसांनी तपासणी केल्यानंतर विजय भास्कर पाटील व किरणकुमार साळुंखे हे त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारने (क्र. एम.एच.20 बी.एन.090) रात्री 10.15 ते 10.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या इतर साथीदारांसोबत आले. त्यांनी बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या कापडी पिशवीत काही फाईल्स व रक्ताने माखलेला चाकू घरात ठेवला होता. यामागे मला गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचा कट आहे. या सर्व बाबींचे सीसीटीव्ही फुटेज व रेकॉर्डिंग असल्याचे भोईटे यांनी तक्रारीत म्हटले होते. तक्रारदाराच्या पुरवणी जबाब आणि गुन्ह्याचा तपासीअंती यामध्ये संशयित तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण चव्हाण, महेश आनंदा पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, जयेश भोईटे आणि सुनील दत्तात्रय माळी या संशयिताची नावे वाढविण्यात आली होती.

चाळीसगावात केली कारवाई
चाळीसगाव येथे दाखल खंडणीच्या असलेल्या गुन्ह्यासंदर्भात अ‍ॅड. प्रवीण चव्हाण हे रविवारी चाळीसगावात आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली तर चाळीसगावातील खंडणी प्रकरणात अ‍ॅड.चव्हाण यांना यापूर्वीच अटकपूर्व मंजूर झाला आहे. दरम्यान, चाळीसगाव येथून अ‍ॅड.चव्हाण यांना जळगाव शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई सुरू होती. या गुन्ह्याचा तपास निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाडकरीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !