यवतमाळच्या आरोग्य सेवकाला जळगावात लुटले : दोघांविरोधात गुन्हा


Health worker of Yavatmal robbed in Jalgaon: Crime against both जळगाव : यवतमाळ येथून कामानिमित्त जळगावात आलेल्या एकाला जळगावात दोघांनी लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजता घडली. या प्रकरणी दोघां विरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
यवतमाळ येथील हरीष गोपाल पाटील (46) हे आरोग्य सेवक असून कामानिमित्त ते जळगावातील कोंबडी बाजाराजवळील बुरहाणपूर जिलेबी दुकानाजवळ आले असता अज्ञात दोघांनी त्यांचा रस्ता अडवत त्यांच्या पँटच्या खिश्यातील पाच हजार 200 रुपयांची रोकड जबरी काढून पोबारा केला. शनिवारी सायंकाळी पाटील यांनी जळगाव शहर पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विजय निकुंभ करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !