जळगावातील महिलेचा उंचावरून पडल्याने मृत्यू


जळगाव :  घर काम करताना उंचावरून पडून जखमी झालेल्या 47 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील स्वामी विवेकानंद नगरा घडलेल्या घटनेप्रकरणी शनिवारी दुपारी एक वाजता जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव शहरातील स्वामी विवेकानंद नगर परिसरात जयश्री गजेंद्र ओझा (47) या आपल्या परीवारासह वास्तव्याला होत्या. गुरुवार, 23 फेब्रुवारी रोजी जयश्री ओझा ह्या घरी काम करत असतांना उंचावरून खाली पडल्या. या त्यांच्या दोन्ही पायांना आणि कमरेला गंभीर दुखापत झाली व मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. जखमी बवस्थेत त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले मात्र उपचार सुरू असतांना शनिवारी यांची प्राणज्योत मालविली. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार तुषार जवरे करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !