होय, गिरीश महाजनांवर मोक्काची तर फडणवीसांना जेलमध्ये टाकणार होते मविआ सरकार ! : मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
Yes, Mokka on Girish Mahajan and Fadnavis was going to be jailed by Mavia government ! : Chief Minister’s secret blast stirs excitement मुंबई : गिरीश महाजन यांच्यावर मोक्कान्वये कारवाईची तयारी झाली होती तर देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी मविआ सरकारमध्ये झाली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
होय, त्या घटनेचा मी साक्षीदार
आम्ही चहापानाला गेलो तर महाराष्ट्रद्रोह झाला असता, या विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी शिंदे म्हणाले की, ‘मविआ सरकारच्या काळात गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला, ही चर्चा माझ्यासमोर झाली. महाजन यांना तर मोक्का लावण्याची तयारी केली होती. त्याचा मी साक्षीदार आहे; पण त्यावेळी मी काय म्हणालो, हे आज सांगणार नाही, पुढे योग्य वेळी सांगेन,’ असाही खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला. दरम्यान, यावर आता गिरीश महाजन आणि फडणवीस काय प्रतिक्रिया देतात?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
मग त्यांचा का नाही घेतला राजीनामा
विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून त्यांची मानसिकता दिसून आली. मला त्यांना सांगायचे आहे की, दाऊदची बहीण हसीना पारकरला ज्यांनी चेक दिला, त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला, तरीही त्यांचा राजीनामा अजित पवार यांनी घेतला नाही. बरे झाले, अशा राष्ट्रद्रोह्यांसोबत चहा पिण्याची वेळ टळली, असा टोला त्यांनी लगावला.