आधी केली बहिणीची हत्या नंतर स्वतःदेखील घेतला गळफास
Satara district shaken: Accused also commits suicide by killing mother-in-law’s sister पुसेसावळी : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वांझोळी येथे भावानेच मावस बहिणीचा खून करीत गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्नेहल वैभव माळी (24, सध्या रा.वाझोळी, ता.खटाव, मूळ. शामगाव ता.कराड) असे मृत युवतीचे नाव आहे तर दत्तात्रय माळी (27) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. कोणत्या कारणातून भावाने हे कृत्य केले हे पोलिस तपासानंतरच समोर येणार आहे. अधिक तपास औंधचे स.पो.नि दत्तात्रय दराडे करीत आहेत.

