झुंज ठरली अपयशी : जळगावातील जखमी तरुणीचा अखेर मृत्यू


The fight ended in failure: the injured young woman in Jalgaon finally died जळगाव : शहरातील एका खाजगी जीममध्ये सेल्स मॅनेजर असलेली 27 वर्षीय तरुणी दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाली होती. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असता तिचा मृत्यू ओढवला. पूनम सुनील विसपुते (27, रा.आशाबाबानगर) असे मयत तरुणीचे नाव आहे.

दुचाकी घसरल्याने अपघात
शहरातील आशाबाबा नगरात पूनम कुटुंबियांसह वास्तव्यास होती व एका जीममध्ये सेल्स मॅनेजरही होती. गत मंगळवारी पहाटे सहा वाजता दुचाकीने जात असताना तिचा अपघात होवून ती जखमी झाली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान शनिवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. मृत पूनमच्या पश्चात वडील, भाऊ आणि मोठी बहिण असा परीवार आहे. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल तुषार जावरे करत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !