17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवले : चाळीसगावातील घटना


A minor girl from Chalisgaon was abducted चाळीसगाव : 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञाताविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला.

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळवले
चाळीसगाव शहरातील एका भागातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसह राहते. रविवारी दुपारी दुकानातून कुल्फी आणते म्हणून ती बाहेर पडली मात्र परतलीच नाही. नातेवाईकांकडे शोधाशोध केल्यानंतरही तपास न लागल्याने अज्ञाताने तिला फूस लावून पळवल्याच्या संशयातून मुलीच्या वडीलांनी चाळीसगाव शहर पोलिसात तक्रार नोंदवली. तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !