दुचाकीवरून गांजाची वाहतूक : 60 हजारांच्या गांज्यासह आरोपी चोपडा पोलिसांच्या जाळ्यात
Transport of ganja on two-wheeler: Accused Chopra in police net with ganja worth 60,000 चोपडा : गांज्यावरून गांज्याची तस्करी करणार्या संशयीताच्या चोपडा शहर पोलिसांन मुसक्या बांधल्या आहेत. चोपडा-लासुर रस्त्यावर सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात रमजान जाबाज तडवी (42, वरगव्हाण, ता.चोपडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या ताब्यातून 60 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा ते लासुर रोडवरील हॉटेल फौजीजवळ दुचाकीने गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती चोपडा शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अधिक सावळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते.सोमवारी सायंकाळी सात वाजता संशयीत रमजान जाबाज तडवी (42, रा.वरगव्हाण) हा दुचाकीवरून आल्यानंतर त्याची चौकशीत एका पिशवीत 60 हजार रुपये किंमतीचा व सहा किलो वजनाचा गांजा आढळल्याने तो जप्त करण्यात आला तसेच संशयिताविरोधात पोलिस नाईक संतोष पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे करीत आहे.



