जळगावात उपद्रवींनी चारचाकीवर दगडे भिरकावल्यने दिड लाखांचे नुकसान
In Jalgaon, miscreants pelted stones on four-wheelers causing damage of Rs.1.5 LAKH जळगाव : उपद्रवी माथेफिरूने घराबाहेर उभ्या असलेल्या चारचाकीवर दगड भिरकावल्याने चारचाकीचे नुकसान झाले. या प्रकरणी सोमवारी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
टोळक्याचा शहरात पुन्हा उपद्रव
जळगावातील शिवकॉलनीत प्रदीप पंढरीनाथ राणे यांनी अलीकडच चारचाकी कार खरेदी केली होती. गुरुवार, 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांनी त्यांची कार ही घराजवळील मोकळ्या जागेत उभी केली असता शुक्रवार, 17 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता त्यांना घराबाहेर मोठा आवाज आल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यांना कारजवळून काही टारगट मुले पळताना दिसली. एक दुचाकीस्वार तरूण इतर मुलांना इशारे करून काही तरी सांगताना दिसला तर अन्य मुलांनी दगड उचलून कारला फेकून मारल्याचे दिसून आले. अखेर राणे यांनी कारची पाहणी केल्यावर त्यांना मागील काच फुटलेला तर पार्किंग कॅमेरा व डिक्कीचा लॉक तुटलेला आढळला. सोमवारी, 27 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता राणे यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून कारचे दीड लाख रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी सहा मुलांविरूध्द तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय सपकाळे करीत आहे.

