धावत्या रेल्वेखाली आलेल्या जळगावातील अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू


Unfortunate death of a minor boy from Jalgaon who came under the running train जळगाव : शहरातील हरीविठ्ठल नगरातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा जळगाव ते शिरसोली रेल्वेलाईन दरम्यान धावत्या रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजता घडली. रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रोहित लक्ष्मण मोरे (16, तडवी गल्ली, हरीविठ्ठल नगर, जळगाव) असे मृत मुलाचे नाव आहे.

कागदपत्रांद्वारे पटली ओळख
रोहित हा हरीविठ्ठल नगरातील तडवी गल्लीत आई किरणबाई व वडील लक्ष्मण मोरे यांच्यासोबत वास्तव्याला होता व रामानंद नगरातील बहिणाबाई चौधरी माध्यमिक विद्यालयात दहावीचे शिक्षण घेत होता. सोमवारी दुपारी चार वाजता रोहित हा घरात कुणाला काहीही न सांगता घराबाहेर पडला. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जळगाव-शिरसोली रेल्वेलाईन दरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक 415/16 ए जवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. खिश्यातील कागदपत्राच्या आधारे त्याची ओळख पटली. तपास पोलिस कॉन्स्टेबल विकास महाजन करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !