भुसावळात जुगाराचा डाव उधळला : सहा जुगारी गजाआड

पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांची धडक कारवाई
भुसावळ : शहरातील लिंपस क्लब परीसरात जुगाराचा डाव रंगात आला असतानाच पोलिसांनी धाड टाकत सहा जुगारींना गजाआड केले. आरोपींच्या ताब्यातून 41 हजारांंची रोकड, पाच मोबाईल व पाच वाहने असा 1 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या नेतृत्वात पोलिस कर्मचारी संकेत झांबरे, विशाल सपकाळे, विनोद वितकर, नेव्हील बाटली, चेतन ढाकणे, श्रीराम पदमर, सागर साळुंखे, गोविंदा सुरवाडे यांनी ही कारवाई केली. संशयित अॅण्ड्रो जोसेफ फ्रान्सीस, शेख खलील शेख हकीम, श्रीराम घारू, विक्रांत देवपुजे, प्रल्हाद घारू, संजू नरवाडे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.


