भुसावळात संतोषी माता क्रेडीट सोसायटीला जिल्हा ग्राहक आयोगाचा दणका

भुसावळ शहरातील ठेवीदारांना रक्कम व्याजासह देण्याचे दिले आदेश


District Consumer Commission slaps Santoshimata Credit Society in Bhusawal भुसावळ : ठेवीची मुदत संपल्यानंतरही रक्कम परत न मिळाल्याने शहरातील ठेवीदारांनी संतोषी माता अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीविरुध्द जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार केली. . या तक्रारीवर ग्राहक आयोगाने संबंधीत संतोषी माता को ऑप क्रेडीट सोसायटीने 9 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम व त्रासापोटी दहा हजार रुपये व खर्चापोटी पाच हजार रुपये भरपाईचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.

ठेवीदारांना मोठा दिलासा
शहरातील ठेवीदार विनय रामखिलावन यादव, विजय रामखिलावन यादव, विमला रामखिलावन यादव, विनिता रामखिलावन यादव (सर्व रा. गडकरी नगर, भुसावळ) यांनी संतोषीमाता अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी, भुसावळ या पतसंस्थेत ठेव रक्कम पाच लाख 61 हजार 998 रुपये गुंतवणूक केली होती. ठेवीची रक्कम वेळोवेळी परत व्याजासह मागणी केल्यावरही संस्थेने परत देण्यास टाळाटाळ करून नकार दिल्याने ठेवीदार यांनी जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोग जळगांव समोर ग्राहक तक्रारी क्रमांक 538/2022 सप्टेंबर महिन्यात दाखल केले. ठेवीदारांच्या तक्रारींवर जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोग यांनी सोमवार, 13 फेब्रुवारी रोजी निर्णय घोषित केला. या तक्रारीचा निकाल सहा महिन्यात झाला असुन ठेवीच्या कालावधी संपल्यापासुन एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम अदा होईपावेतो तकारदार यांना देण्यात यावे तसेच तकारदार यांना मानसिक, शारिरीक, आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई दहा हजार रुपये व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्यात यावे, असे आदेश ग्राहक आयोगाचे प्रभारी अध्यक्षा पूनम मलिक व सदस्य सुरेश जाधव यांनी पारीत केले. तक्रारदारातर्फे भुसावळातील अ‍ॅड. राजेश एस.उपाध्याय यांनी बाजू मांडली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !